संशोधन आणि विकासासाठी भारत-इस्रायल एकत्र
-
संशोधन आणि विकासासाठी इंडो-इस्रायलचा एकत्रित प्रयत्न
-
8/10/2012
-
-
GovXContentSection
संशोधन आणि विकासासाठी इंडो-इस्रायलचा एकत्रित प्रयत्न
* भारतीय विद्यार्थ्यांना देणार १०० शिष्यवृत्त्या
* एकत्रितपणे ३ कोटी डॉलरची गुंतवणूक
रोहन टिल्लू, मुंबई, बुधवार, ८ ऑगस्ट २०१२
उच्च शिक्षणासाठी युरोप, अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांना पसंती देणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना आता आणखी एका देशात संधी उपलब्ध झाली आहे. भारत-इस्रायलमधील राजनैतिक संबंधांना २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उभय देशांनी सुरू केलेल्या योजनांमुळे आता दरवर्षी भारतीय विद्यार्थ्यांना इस्रायलमधील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी १०० शिष्यवृत्त्या देण्यात येतील. त्याचबरोबर संशोधन आणि विकास यांना महत्त्व देत उभय देशांनी तीन वर्षांच्या कालावधीसाठी तीन कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचाही निर्णय घेतला आहे.
भारत आणि इस्रायल गेल्या २० वर्षांमध्ये खूप जवळ आले आहेत. दोन्ही देशांचा भौगोलिक विस्तार आणि परिस्थिती यातील भेद वगळता अनेक बाबींमध्ये साम्य आहे. त्यामुळे उभय देशांपुढील समस्याही सारख्याच आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांनी एकत्रितपणे अधिकाधिक काम करण्याचा निर्धार केल्याचे मुंबईतील इस्रायलच्या वाणिज्य दूत ऑर्ना सागीव्ह यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. उभय देशांतील या संबंधांचा चांगला परिणाम शैक्षणिक क्षेत्रावर होणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
भारताप्रमाणे इस्रायलमध्ये खूप विद्यापीठे नाहीत. आमच्या देशात केवळ सात विद्यापीठे आहेत. तसेच आमचा देश नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बाबतीतही खूप मागासलेला आहे. त्यामुळे आम्ही आमच्याकडील मनुष्यबळावर जास्त भर देतो. परिणामी संशोधन आणि विकासासाठी आम्ही आमच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४.७ टक्के एवढा वाटा देतो. आता आम्ही भारतातील विद्यार्थ्यांना आमच्या देशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेता यावे, यासाठी काही योजना आखल्या आहेत, असे सागीव्ह यांनी सांगितले.
या योजनांनुसार आता भारतातून डॉक्टरेट केलेल्या विद्यार्थ्यांना अधिक उच्च शिक्षणासाठी इस्रायलमधील विद्यापीठांत १०० शिष्यवृत्ती देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे उभय देश तीन वर्षांच्या कालावधीसाठी दरवर्षी प्रत्येकी पाच दशलक्ष डॉलर्स याप्रमाणे ३० दशलक्ष डॉलर्स एवढी रक्कम गुंतवणार आहेत. ही रक्कम विविध विषयांतील संशोधन आणि विकास कार्यक्रमांसाठी वापरण्यात येईल.
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-