इस्रायली शेतीतंत्र भारतात - ओर्ना सगीव
-
महाराष्ट्राचे मुख्यालय दापोलीत
-
8/19/2012
-
-
GovXContentSection
भारताची अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे आणि शेतकरीच यातील मुख्य घटक आहे. पारंपरिक शेतीमुळे उत्पन्नाला र्मयादा येतात, याची जाण येथील शेतकर्यांना झाली आहे. त्यामुळेच इस्त्रायल तंत्रज्ञानाच्या हातात हात घालून भारतीय शेतीने एक नवी वाट धरली आहे. अठरावे त्रिवार्षिक कृषी-तंत्रज्ञान प्रदर्शन मे २0१२मध्ये इस्त्रायलमध्ये आयोजित करण्यात आले होते. ४0 पेक्षा जास्त देशांतील हजारो शेतकर्यांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली. यात भारतातील तब्बल दोन हजारांवर शेतकर्यांनी सहभाग नोंदविला. हाच विचार करून दोन्ही देशांनी तीन वर्षांची योजना आखली आहे. याअंतर्गत दोन्ही देशांच्या संयुक्त विद्यमाने भारतात चार कृषी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. प्रारंभी अशी पाच केंद्रे सुरू करण्याची योजना होती. त्यानुसार हरियाणात दोन आणि महाराष्ट्रात तीन केंद्रे ठरविण्यात आली. मात्र जानेवारी २0११मध्ये हरियाणात या केंद्राची सुरुवात झाली आणि अनेक राज्यांतून अशा केंद्रांची मागणी होऊ लागली. त्यामुळे आठ राज्यांत अशी २८केंद्रे सुरू करण्याचा विचार केला जात आहे. त्या कामालादेखील प्रारंभ झाला आहे.यातील चार केंद्रे महाराष्ट्रात आहेत. नागपूर केंद्र येत्या काही महिन्यांत सुरू होणार असून, या केंद्रात लिंबावर फोकस असेल. औरंगाबाद केंद्रात केसर आंबा, राहुरीत डाळिंब आणि दापोलीत आंब्यावर फोकस असेल. या वर्षीआम्ही दापोलीतील कोंकण कृषी विद्यापीठात इस्त्रायली तंत्रज्ञानाचा वापर केला आणि त्याचा चांगला परिणाम देखील समोर आला. ..........................तज्ञांशी थेट संवाद■ भारतातील वेगवेगळ्या ठिकाणच्या २८ केंद्रांना चालविणे इस्त्रायलसारख्या छोट्या देशाला मोठे आव्हान आहे. यातून आम्ही एक मार्ग काढला. ■ भारतातील पाच ते सहा केंद्रे आंब्याच्या वेगवेगळ्या प्रजातींवर अभ्यास करणार आहेत. यातील दापोली हे केंद्र मुख्यालय असेल. ■ इस्त्रायलच्या तंत्रज्ञांना या पाच-सहा केंद्रांना भेटी द्यावयाच्या असल्यास ते दापोलीला भेट देतील आणि तेथूनच ते शेतकरी व तज्ञांशी संवाद साधतील. या प्रयोगामुळे वेळ वाचतो. ■ पैसा वाचतो आणि अधिकाधिक तज्ञांशी संवाद साधणे शक्य होते. ■ ही केंद्रे म्हणजे दोन्ही देशांतील कृषी तंत्रज्ञान देवाणघेवाणीची केवळ सुरुवात आहे. याशिवायदेखील खासगी क्षेत्र, लोकसहभाग वाढायला हवा. ■ भारताची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. या क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इस्त्रायलच्या कंपन्यांना भारताची दारे खुली झाली आहेत. यातूनच पुढील काळात कृषी क्रांतीचा एक नवा आध्याय समोर येणार आहे.(This article is translated into Marathi and has been edited. It differs from the original article written by Consul General Mrs. Orna Sagiv)
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-